30 दिवसाची फूड बीझनेस ट्रेनिंग

फास्ट फूड व्यवसाय सुरु करायची शून्यापासून पूर्ण तयारी

तारीख: 10 जुलै वेळ: दुपारी 12.30

सर्व जागा भरल्या आहेत...

वेटिंगलिस्टमध्ये नाव देण्यासाठी साठी खाली रजिस्टर करा

वेटिंगलिस्ट मध्ये नाव देण्याची शेवटची तारीख 10 जुलै आहे

ही ट्रेनिंग कोणासाठी आहे?

  • ज्यांना येत्या 2-3 महिन्यात फूड स्टॉल/ट्रक/कॅफे सुरु करायचा आहे

  • ज्यांना त्यांच्या मेनूमध्ये NATTY CHEF चे बर्गर्स ADD करायचे आहेत

  • जे लोक त्यांचा सध्याचा फूड व्यवसाय अजून चांगल्या पद्धतीने चालवू इच्छितात

ही ट्रेनिंग कोणासाठी नाही

  • जे लोक सिरीयस नाहीत आणि आर्थिक गुंतवणूक करायला तयार नाहीत

  • ज्यांना 3-4 महिन्यामध्ये त्यांचा फूड बिझनेस स्टार्ट करायचा नाहीये

तुम्ही काय शिकाल?

  • आपल्याकडे 18 प्रकारचे बर्गर्स आहेत. त्यामध्ये 6 व्हेजआणि 12 नॉनव्हेज रेसिपी आहेत.

  • Pizza(8 types, fries(6 types), pasta(2 types) , wraps(5 types) , sandwich(6 types), fried chicken(5 types) , shakes, mocktails.

  • आमचा सीक्रेट व्हायरल सॉस

  • ग्राहक सांभाळण्याचा अनुभव

  • किचन मॅनेजमेंट स्किल्स

  • किचन मॅनेजमेंट स्किल्स

  • कॅफे साठी लागाणारे मटेरियल कुठून असायचे आणि कशे साठवायचे

  • रेसिपी बनवण्याचा खर्च कसा शोधायचा

  • तुमचा फूड व्यवसायाचे मार्केटिंग कसे करावे

  • पर्सनल ब्रँड आणि कन्टेन्ट निर्मितीचे महत्व

  • तुमचा नफा वाढवण्यासाठी स्ट्रॅटेजि कशी तयार करावी

माझ्याबद्दल थोडीशी माहिती

नमस्कार,

माझं नाव शुभम धाडगे आहे, पण सगळे मला नॅटी शेफ म्हणून ओळखतात.

माझी गोष्ट थोडक्यात सांगतो...

मी सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये अ‍ॅडमिशन घेतली होती, पण पहिल्याच वर्षात कळलं की हे क्षेत्र माझं नाही. तरीही मी सहा महिने राहिलो आणि मग ठाम निर्णय घेऊन कॉलेज सोडलं. हे ऐकून माझ्या आईवडिलांना खूप वाईट वाटलं.

पण माझं खरं प्रेम स्वयंपाक होतं, आणि तेच मी करायचं ठरवलं.

कॉलेज सोडल्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतली.

डिग्री पूर्ण झाल्यावर मला यूएसमधल्या एका पाचतारांकित हॉटेलमध्ये इंटर्नशिपची संधी मिळाली होती, पण पॅन्डेमिकमुळे ती संधी निसटली.

सगळं बिघडत असतानाही माझ्या अंतःकरणातली एक आवाज म्हणत होती, "हे अजून संपलेलं नाही!"

मी माझ्या सॉफ्ट स्किल्स आणि कुकिंग स्किल्समध्ये गुंतवणूक केली आणि माझ्या गावात एक कॅफे सुरू केला. सुरवातीला ग्राहकच मिळत नव्हते. बऱ्याच अडचणी होत्या.

मला वाटलं, मी चुकीच्या शहरात आहे.

मग मी माझा कॅफे पुण्यात हलवला. पण तिथेही काहीच बदल झाला नाही. फक्त एवढंच मिळायचं की खर्च भागवता यावा.

माझ्या मार्केटिंग क्षेत्रातल्या मित्रांनी मला कंटेंट बनवायला आणि काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरायला सांगितलं.

आणि बस... त्यानंतर सगळं बदललं.

जिथे एका वर्षात जेवढं कमावलं नव्हतं, तेवढं फक्त ६० दिवसांत कमावलं!

आज अनेक तरुण आणि उत्साही लोक मला विचारतात की कॅफे कसा सुरू करावा?

म्हणून मी ठरवलंय —

मी माझ्या सगळ्या रेसिपीज, अनुभव, आणि बेस्ट स्ट्रॅटेजीज शेअर करणार आहे.

आणि म्हणूनच ही ट्रेनींग तुमच्यासाठी!